तुळजाभवानी पुजारी मंडळ समिती सदस्य


Shri Tuljabhavani Tuljapur!! महारष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी !!

tuljabhavani devi

श्री तुळजाभवानी नवरात्र

अश्विन शु. प्रतिपदा ते अश्विन शु. पौर्णिमा या कालावधीत श्री तुळजाभवानी देवीचे नवरात्र असते.नवरात्र कालावधीत लाखो देविभक्त देविच्या दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात.श्री देवीने अश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत महिशासूर या दैत्याचा पराभव केला त्या प्रसंगाची आठवण म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो.या उत्सवाची सुरुवात अश्विन शु. प्रतिपदापासून घटस्थापनेने होते व सांगता अश्विन शु. पौर्णिमेने होते. या कालावधीत अनेक देवीभक्त देवीचा उपवास करतात.नवरात्र कालावधीत देवीच्या पादुकांची मंदिर आवारात मिरवणूक काढली जाते.त्यास छबिना/पालखी म्हणतात.तो पालखी सोहळा पाहण्यासाठी अनेक भक्त कवड्याची माळ धारण करून पोत ओवाळण्यासाठी मंदिरात जमा होतात.अनेक देवीभक्त नवरात्राचे नऊ दिवस उपवास पाळतात.उपासनेचे प्रकार वेगवेगळे असले तरी देवीची कृपा संपादन करणे हाच त्यामागचा हेतू आहे.
नवरात्र कालावधीत देवीच्या अलंकार पूजा :-अश्विन शु. १ ते अश्विन शु.३  आणि अश्विन शु. ९- देवीची अलंकार महापूजाअश्विन शु. ४ – रथ अलंकार महापूजा
महत्व:
भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला.त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली जाते.अश्विन शु. ५ – मुरली अलंकार महापूजा
महत्व:
तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्रीस अर्पण केली.त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली जाते.श्रीने मुरली वाजवील्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले.अश्विन शु. ६ – शेषशाही अलंकार महापूजा
महत्व:
भगवान विष्णू शेषशैयेवरती विश्राम करत असताना मातेने यांचे नेत्रकमळात विश्राम घेतला यावेळी भगवान विष्णू यांच्या मलापासून निर्माण झालेल्या दोन दैत्यांचा वध श्री देवीने ब्रह्मदेवाने स्तुती करून श्रीस जागविल्यानंतर भवानीने केला त्यानंतर विष्णूने आपली शैया श्रीस अर्पण केली.त्यामुळे षष्टीस शेषशाही अलंकार पूजा बांधली जाते.अश्विन शु. ७ – भवानी अलंकार महापूजा
महत्व:
छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानीने प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देवून आशीर्वाद दिले.यामुळे भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येते.अश्विन शु. ८ – महिषासुरमर्दिनी अलंकार
महत्व:
साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानीने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला.त्यामुळे महिषासूरमर्दिनी हा अलंकार बांधण्यात येतो.या दिवशी तुळजाभवानी मंदिरात असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये होमहवन करून पूर्णाहुती दिली जाते.अश्विन शु.९ – महानवमी
महत्व:
नवमीला धार्मिक विधी होतात.नवमीस घटोत्थापन केले जाते.अश्विन शु.१० – विजयादशमी दसरा
महत्व:
उषःकाली देवीचे सीमोल्लंघन केले जाते.या दिवशी बर्हाणपूर येथून पालखी व भिंगार येथून पलंग यांचे आगमन होते.तसेच पालखीतून मिरवणूक पार पडून देवी पलंगावर विश्रांती(श्रमनिद्रा) घेते.अश्विन शु.१५ – पौर्णिमा
महत्व:
पौर्णिमेस देवीला महापूजा बांधण्यात येते.या दिवशी सोलापूरच्या काठ्यासह छबिना काढण्यात येतो.या दिवशी अनेक भाविक सोलापूर पासून तुळजापूरला चालत येतात.या दिवशी नवरात्राची
सांगता होते

भक्त निवास रूम बुकिंगShri Tuljabhavani Bhakt Niwas Room Booking

Room Booking Services

2 bed with attached bathroom toilet ,colors TV ,24 hours light,free parking ,CCTV camera security etc.

3 bed with attached bathroom toilet ,colors TV ,24 hours light,free parking ,CCTV camera security etc.

5 bed with attached bathroom toilet ,colors TV ,24 hours light,free parking ,CCTV camera security etc.

10 bed with attached bathroom toilet ,colors TV ,24 hours light,free parking ,CCTV camera security etc.

function hall, toilet ,24 hours light,free parking ,CCTV camera security etc.Tourist Point Near Tuljapur श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात असलेले धार्मिक ठिकाणे आणि पर्यटनस्थळे

भक्त निवास रूम बुकिंग साठी  श्री तुळजाभवानी पुजारी मंडळास  संपर्क साधावा !!